श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. नारायण हरी जोगळेकर (वय ७०, रा. बा. ना. सावंत रोड, दत्त मंगल कार्यालय समोर, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नारायण जोगळेकर हे घरी असताना त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापुर्वीच तपासून मृत घोषित केले.