मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील नेवरे खाडी किनारी निपचित स्थितीत आढळून आलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. संजय अनंत गावडे (वय ५४, रा. ढोकमळे, पो. नेवरे रत्नागिरी) असे मृत प्रौढाचा नावे आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) सकाळी साडेदहाच्या सुमारास नेवरे खाडी किनारी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय गावडे हे रविवारी (ता. २४) दुपारी तीनच्या सुमारास ढोकमळे, नेवरे, काजिरभाटी समुद्रकिनारी व खाडीकिनारी पागवे मासेमारी करिता गेले होते. ते रात्री उशिरापर्यत घर परत आले नव्हते. सोमवारी ते नेवरे खाडी किनारी निपचित अवस्थेत सापडले. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.