हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या भाटीमिऱ्या येथे नारळाच्या बागेत आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई साहित्यासह ९५० रुपयांची ९ लिटर दारु जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. २३) रात्री सव्वा आठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला ही विनापरवाना हातभट्टीची दारु भाटीमिऱ्या आमरेवाडी येथील नारळाच्या बागेत एका नारळाच्या झाडाच्या आडोशाला विक्री करत असताना निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय आंब्रे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.