एमआयडीसीत दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील नवलाई आर एम सी चौक ते एम के इंजिनिअरिंग कंपनीकडे रस्त्यावर आडोशाला गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५२० रुपयांची ५ लिटर दारु जप्त करण्यात आली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पांडुरंग बंडबे (वय ४६, रा. कोळंबे, बंडबे गोरीवलेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास कंपनीकडे जाणाऱ्या बंद प्लॉटच्या आडोशाला निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना हातभट्टी दारु विक्री करत असताना सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून ५२० रुपयांची ५ लिटर दारु जप्त केली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.