श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू
रत्नागिरी ः श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून उपचारापुर्वीच मृत घोषित केले. लक्ष्मी मधुकर पालेकर (वय ७३, रा. वरचा फगरवठार, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २०) सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी या काजरघाटी येथे नातेवाईकांकडे असताना अचानक तिला घाम फुटून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तात्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच तिला वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.