मेर्वी खालची म्हादयेवाडी येथेदोन महिलांकडून कोयतीने वार
रत्नागिरी ः
तालुक्यातील मेर्वी खालची म्हादयेवाडी येथे पत्नीवर होणार कोयतीचा वार आपल्या हातावर झेलताना पती जखमी झाला. या प्रकरणी दोन महिलांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना रविवार 17 मे रोजी रात्री 8 वा.सुमारास घडली.
सुजाता कृष्णा भातडे, नेहा कृष्णा भातडे (दोन्ही रा. मेर्वी खालची म्हादयेवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात श्वेता संतोष भातडे (43,रा.मेर्वी मेर्वी खालची म्हादयेवाडी,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री संशयित महिलांनी हातात कोयती घेउन फिर्यादी श्वेता भातडे यांच्या अंगणात जाउन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संशयित महिलांनी श्वेताला तुझा मर्डर करीन अशी धमकी देउन कोयती मारण्यासाठी अंगावर धावून गेल्या. तेव्हा श्वेताचा पती संतोष भातडे मध्ये पडला व त्याने आपला डावा हात पुढे करुन कोयतीचा वार झेलला. यात त्याच्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी संशयित महिलांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1), 131, 352, 351(1), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.