मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड-गायवाडी येथील समुद्र बीचवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या प्रौढा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद भालचंद्र खेऊर (वय ५५, मालगुंड-भंडारवाडा, रत्नागिरी) असे संशयित मद्यपान करणाऱ्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) येथे सायंकाळी सहाच्या सुमारास मालगुंड बीच येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद खेऊर हा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश भागवत यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.