साळवी स्टॉप येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः चक्कर आलेल्या प्रौढाला उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. विनोद केशव जाधव ( वय ५२, रा. जलशुद्धीकरण वसाहत, साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनोद जाधव हे काही वर्षापासून ब्लड प्रेशर, मेंदुचा आजार व चक्कर येण्याचा आजाराने त्रस्त होते. गुरुवारी घरात असतानाच त्यांना चक्कर आली. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.