लॉर्ड बुद्धा फाउंडेशन, सैतवडे आयोजित बहारदार नाट्यप्रयोग “हा छंद प्रियेंचा”
रत्नागिरी:
- आज रविवार, दिनांक १० मे रोजी रात्री ठीक १०:३० वाजता न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे.
या विशेष नाट्यप्रयोगामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “हळद रुसली कुंकू हसला” मधील अभिनेत्री पूजा अर्थात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती निमसे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, त्या आज सैतवडे येथे उपस्थित राहणार आहेत.
या सुंदर आणि मनोरंजक नाट्यप्रयोगाचा आनंद घेण्यासाठी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन लॉर्ड बुद्धा फाउंडेशन, सैतवडे तर्फे करण्यात आले आहे.