श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू
रत्नागिरी ः श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. औषधोपचारापुर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शानु भिकाजी पवार (वय ६२, रा. पोमेंडी बुद्रुक बौद्धवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २) दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शानू या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या रात्री एकच्या सुमारास घरी आल्यातर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापुर्वीचा त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.