चंपक मैदान परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यावर कारवाई
रत्नागिरी:
शहरातील उद्यमनगर येथील चंपक मैदान परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना मौजे उद्यमनगर येथील चंपक मैदानाजवळील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एक इसम संशयास्पद रित्या बसलेला आढळला. पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता, संबंधित तरुण मद्यप्राशन करण्याच्या उद्देशाने विदेशी दारूची बाटली समोर ठेवून बसल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी सज्जाद असलम खान (वय ३३, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे ‘ब्लॅक व्हिस्की’ १८० मिली मापाची विदेशी दारूची बाटली मिळून आली.
याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत प्रकाश बंडबे (वय ३७, नेमणूक रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे