रत्नागिरीचे वीरेंद्र वणजू यांची ‘आयएफबीबीएफ’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ शरीरसौष्ठवपटू श्री. वीरेंद्र वणजू यांची ‘इंडियन फिटनेस अँड बॉडी बिल्डर्स फेडरेशन’ (IFBF) च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बैठकीत एकमताने निर्णय
IFBF च्या या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकर पाटील, राष्ट्रीय सचिव बी. कृष्णराव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सदानंद जोशी, विजय काटदरे, विनय केतकर आणि कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या सहमतीने वीरेंद्र वणजू यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
शरीरसौष्ठव क्षेत्रात आनंदाचे वातावरण
वीरेंद्र वणजू यांनी अनेक वर्षे शरीरसौष्ठवपटू म्हणून जिल्हा आणि राज्य स्तरावर आपले योगदान दिले आहे. सध्या ते रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनमध्ये कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा आता राष्ट्रीय स्तरावर फेडरेशनला मिळणार आहे.
या निवडीनंतर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून आणि शरीरसौष्ठव प्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या नवीन जबाबदारीबद्दल जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.