खूनप्रकरणी तिघांची जामिनावर मुक्तता
खेड : तालुक्यातील मेटे-मोहल्ला येथील शफी अब्दुल्ला वरवटकर (५५) यांच्या खूनप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या कादीर शमशुद्दीन घारे, गणी ईस्माईल बोट, अशरफ महामूद बोट (तिघेही रा. मेटे-मोहल्ला) यांची न्यायालयात जामिनावर मुक्तता केली.
या तिघांनी शफी वरवटकर यांना जुन्या भांडण्याच्या रागातून लाथाबुक्यांनी मारहाण करत खून केला होता. खूनप्रकरणानंतर गेले १५ दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या तिघांच्याही मुसक्या आवळल्यानंतर संशयितांच्या वतीने अॅड. सुधीर बुटाला यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.