खेडेकरवाडी येथील प्रौढाची आत्महत्या
रत्नागिरी ः कावीळच्या आजाराने त्रस्त असलेल्या प्रौढाने घराच्या लोखंडी चॅनलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. अशोक प्रकाश खेडेकर (वय ४७, रा. खेडेकरवाडी, परटवणे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २८) सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत अशोक खेडेकर यांनी एक महिन्यापूर्वी कावीळ झाली होती. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची पत्नी कामावरुन घरी आली असता अशोक याने घराच्या लोखंडी चॅनलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.