भरणेनजीक अपघातात चौघे जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-फागेवाडी येथे शुक्रवारी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास दुचाकीने दिलेल्या धडकेत ४ पादचारी जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जयसिंग सखाराम खोपटकर (६०, भरणे-जाधववाडी), दिनेश गुलाब चव्हाण (४०), संस्कृती दिनेश चव्हाण (११), समृद्धी दिनेश चव्हाण (१२, रा. भरणे-शिंदेवाडी) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.