मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः खेडशी-गयाळवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल गुलाब तिवारी (वय ३८ रा. एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दोनच्या सुमारास गयाळवाडी रेल्वे ब्रीज जवळ निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.