चांदेराई येथे मटका जुगारावर पोलिसांची धाड
रत्नागिरी ः तालुक्यातील चांदेराई-बाजारपेठ येथे पोलिसांनी मटका-जुगारावर कारवाई केली. या कारवाई साहित्यासह ५६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश गजानन रोकडे (वय ३२, रा. हरचेरी तळेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १८) रात्री नऊच्या सुमारास काजळी नदीच्या बाजूला एका पडक्या पत्र्याच्या शेडमध्ये निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रोकडे हा विनापरवाना मटका-जुगार चालवत असताना सापडला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.