सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ; तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या खेडशी ते हातखंबा जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश सखाराम मांडवकर (वय ३३, रा. पानवल, शिंदेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास हातखंबा रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस लक्ष्मण कोकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.