नाणीज-जुनामठ येथे दोन मोटारीमध्ये अपघात ; एक जण जखमी
रत्नागिरी ः कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावरिल नाणीज जुना मठ येथे दोन मोटारीमध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले तर एक जण जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित पुणे येथील मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव प्रथाप हारगुडे (वय ३३, रा. हुरुळी कांचन तुपे वस्ती रेल्वेस्टेशन जवळ ता. हवेली, जि. पुणे) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १०) रात्री अकराच्या सुमारास नाणीज -जुनामठ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित गौरव हारगुडे हे मोटार (क्र. एम-१२ एक्सटी ५४४१) घेऊन कोल्हापूर ते रत्नागिरी असे येत होता निष्काळजीपणे गाडी चालवून नाणीज जुनामठ येथे समोरुन येणारी मोटार (क्र. एमएच-०८ एपी ८४८८) गाडीला धडक दिली.या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले व सचिन गोकुळ पारकर (रा. शिरगाव, रत्नागिरी) हे जखमी झाले व मोटारीतील अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार तृ्प्ती सावंतदेसाई यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.