उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
रत्नागिरी ः उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सिपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल केले तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. मेनका युवराज चव्हाण (वय ३२, रा. गुडलक बेकरी समोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) सकाळी पावणे आठच्या सुमारास सिपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेनका चव्हाण हिने उंदिर मारण्याचे औषध प्राशन केले होते अस्वस्थ वाटू लागल्याने तिला पती युवराज यांने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटले येथे दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.