वाहन पार्क करुन वाहतूकीस अडथळा करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील चर्मालय चौक व गयाळवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस व वाहतूकीस अडथळा करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदिप प्रकाश लाड (वय ४२, रा. क्रांतीनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) व संदिप बबन फोंडे (वय २५, रा. आदर्शनगर, मिरजोळे, रत्नागिरी मुळ ः दाभोळे, धनगरवाडी, ता. संगमेश्वर) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. १६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आल्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित संदिप लाड यांनी कोकणनगर जाणाऱ्या रस्त्यावर मोटार (क्र. एमएच-०८ एपी ३७६७) ही वाहतूक अडथळा होईल अशी पार्क केली. तर संदिप फोंडे यांनी मोटार (क्र. एमएच-०८ ए.एक्स ०१९१) ही रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्यावर गयाळवाडी येथील रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल अशी पार्क केली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष भालेकर व राकेश तटकरी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.