फेसबुक रिल्स मधून खोटे अमिष दाखवू ९ लाख २१ हजार ७०१ रुपयांची फसवणूक
भाटीमिऱ्या येथील घटना ; उत्तरप्रदेशिय तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः पाच रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास १५ लाख रुपये मिळतील असे अमिष दाखवून ९ लाख २१ हजार ७०१ एक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चव्हाण (रा. उत्तर प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या मुदतीत नवीन दत्तमंदिर, भाटीमिऱ्या- रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हेमंत मारुती शिवलकर (वय ५१, रा. नवीन दत्त मंदिर, भाटीमिऱ्या रत्नागिरी) यांनी फेसबुकवर पाहिल्ल्या रिल्सच्या जाहिरीती मधील अमित चव्हाण याने फिर्यादी यांनी पाच रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास १५ लाख रुपये मिळतील असे अमिष दाखवून रक्कम देण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून संशयिताने सांगितलेल्या विविध बॅंक खात्यांमध्ये तसेच गुगल पे च्या माध्यमातून एकूण ९ लाख २१ हजार ७०१ रुपयांची रक्कम स्विकारली. तसेच फिर्यादी हेमंत शिवलकर यांचेय नावे असलेल्या बॅंक खात्यांचा वापर करुन त्यामध्ये इथर लोकांना फसवून त्यांची रक्कम फिर्यादींच्या बॅंक खात्यामध्ये जमा करुन नंतर ती काढून घेऊन दिशा भुल केली. फिर्यादी हे वयोवृद्ध असल्याने बॅंकेत वेळोवेळी न गेल्यामुळे बॅंकेकडून माहिती घेतल्यानंतर मंगळवारी (ता १४) त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित उत्तरप्रदेशिय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.