मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील देवूड-चाटवळवाडी येथे परवाना नसताना मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल गणपत कळंबटे (वय ४४, रा. करबुडे, मुळगाववाडी, सध्या रा. देवूड चाटवळवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता.१४) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित प्रौढ मद्यपान करण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल योगिता नाटुस्कर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.