रत्नागिरी शहर पोलिसांची हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई
रत्नागिरी ः शहरातील झाडगाव झोपडपट्टी येथील पडीक घराच्या पाठीमागे विनापरवाना गावठी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक वृद्ध महिला विनापरवाना गावठी दारुची विक्री करत असताना सापडली. तिच्या कडून साहित्यासह ९५० रुपयांची गावठी दारु जप्त केली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्ध महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.