आरे समुद्रकिनारी वाहून गेलेल्या ठाणे येथील तरुणाचा मृतदेह काळबादेवी येथे आढळला
रत्नागिरी ः शहरानजीकच्या आरे समुद्र किनारी आरे समुद्रकिनारी वाहून गेलेल्या ठाणे येथील तरुणाचा मृतदेह काळबादेवी येथे आढळलापाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह काळबादेवी येथील फडजीवाडी-मारुती मंदिर येथील समुद्र किनारी आढळला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. निशांत राजेश ठाकरे (वय २४, रा. कांताबाई निवास रुम नं ४ रेतीबंदर रोड-डोंबिवली वेस्ट लोटेवाडी, मोठागाव कल्याण जि. ठाणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) सकाळी सव्वासातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.११) सायंकाळी चारच्या सुमारास खबर देणार अंकितकुमार राकेशकुमार सिंह व त्यांचे मित्र हे आरे बीचवर समुद्रात पोहायला गेले असता पाण्यात पोहताना निशांत ठाकरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याला शोधण्याचा प्रय़त्न केला. अखेर त्याचा मृतदेह रविवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास काळबादेवी येथे पोलिस पाटील व पोलिसांना आढळला. निशांत चे वडिल व नातेवाईक या मृतदेहाची पहाणी केली असता तो निशांतचा असल्याचे सांगितले त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.