शिवमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह
खेड : तालुक्यातील शिव-
भोईवाडी येथील जगबुडी नदीकिनारी शिवबंदर जेटीजवळ ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या हाता-पायावरील त्वचा पांढरी व लालसर झालेली आहे. त्याने काळ्या रंगाची फुलपॅन्ट परिधान केली आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांनी केले आहे.