उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी, : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 6.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल अद्ययावतीकरण कामाची पाहणी ( स्थळ : जिल्हा क्रिडा संकुल, मिरजोळे) सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र येथे भेट व पाहणी (स्थळ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ) ITI) परिसर, नाचणे रोड, )
सकाळी 11 वाजता जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक ( स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 12 वाजता
रत्नागिरी जिल्हा म.रा.मा.प. म. तसेच देवरुख बस डेपो संदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 1.30 वाजता प्राणी संग्रहालय आढावा बैठक ( स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) दुपारी 2.30 ते 3 वाजता राखीव (स्थळ : शासकीय विश्रामगृह) दुपारी 3.30 वाजता फुलराणी कक्ष उद्घाटन (स्थळ : पावस विद्यामंदिर, पावस) सायंकाळी 5 वाजता पावस गणपती मंदिर पुलाचे भूमीपूजन ( स्थळ : पावस ) सायंकाळी 6 वाजता राखीव ( स्थळ : शासकीय विश्रामगृह ). रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथे राखीव.
शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजता जनता दरबार ( स्थळ : नविन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 3 वाजता रत्नागिरी तालुका व रत्नागिरी शहर शिवसेना कार्यकारिणी आढावा बैठक (स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी) सायंकाळी 5 वाजता फुलराणी कक्ष उद्घाटन (स्थळ : फाटक हायस्कूल, झाडगांव ) रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथे राखीव. रात्रौ 11.30 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.