रत्नागिरीत ‘मेकॅनिक प्रीमियर लीग’ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार आयोजन
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील व्यावसायिक टू-व्हीलर मेकॅनिक बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशनच्या वतीने ‘मेकॅनिक प्रीमियर लीग २०२६’ या भव्य जिल्हास्तरीय अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज, सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व मेकॅनिक बांधवांमध्ये एकोपा निर्माण व्हावा आणि त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या ‘महासंग्रामाचे’ आयोजन करण्यात आले आहे. नेहमी गाड्यांच्या दुरुस्तीत व्यस्त असणारे हात आता क्रिकेटच्या मैदानावर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
उद्घाटन समारंभ सोमवार, ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शिवरुद्र टर्फ स्पोर्ट्स क्लब, कृषी बाजार समिती, शांतीनगर, रत्नागिरी.येथे संपन्न झाला. यावेळी
जिल्हाभरातील संघांचा सहभाग जाणवत होता.
या स्पर्धेसाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून व्यावसायिक मेकॅनिकचे विविध संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा ‘अंडर आर्म’ स्वरूपाची असून, जिल्हास्तरीय स्तरावर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर मेकॅनिक बांधवांसाठी अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.
असोसिएशनच्या वतीने सर्व हितचिंतक प्रायोजक, जिल्ह्यातील सर्व मेकॅनिक बंधू आणि क्रीडा रसिकांनी या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महासंग्रामाचे साक्षीदार झाले आहेत, असे रत्नागिरी जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशन’ तर्फे सांगण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील मेकॅनिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून, मैदानावरील या क्रिकेटच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

