रत्नागिरी ः शहरातील चर्मालय ते कोकणनगर जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी चालविण्याचा परवाना नसताना निष्काळजीपणे वाहन चालवून दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तसेच एक तरुण जखमी झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित दुचाकी महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पूजा प्रथमेश सोगम (वय ३२, रा. साई मंदिरजळ विनम्रनगर, गोडाऊन स्टॉप, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना २० मार्च ला सकाळी ११ च्या सुमारास चर्मालय ते कोकणनगर जाणाऱ्या रस्त्यावर राजनगर येथील बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम जवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला हि वाहन चालविण्याचा परवाना नसताना दुचाकी (क्र. एमएच-०९ बीआर ७२५०) घेवून कोकणनगर ते चर्मालय अशी जात असताना निष्काळजीपणे दुचाकी चालवून चर्मालयहून येणारी दुचाकी (क्र. एमएच-०८ बीएच २२८६) वरिल चालक रक्षा राजेश पुनस्कर (वय १९, रा. कोकणनगर-रत्नागिरी) हिला ठोकर दिली. या अपघातात रक्षा जखमी झाली.दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.