रत्नागिरी, ता. २ः तालुक्यातील पाली बाजारपेठ येथे कर्तव्य बजावणाऱ्या एसटी चालकाला मारहाण केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आनंद माणिक सोनवणे (वय २५, रा. कोंडगाव ता. भिवंडी जि. ठाणे) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १) सायंकाळी पाचच्या सुमारास पाली बाजारपेठ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी एसटी चालक मनोल भानुदास सोळुंके (वय ३७, रा. लांजा डेपो रत्नागिरी, मुळे रा. कोलते पिंपगाव ता. भोकरगाव जि. जालना ) हे एसटी (क्र। एमएच-१४ एलएक्स ६९२७) यावर कर्तव्य बजावत असताना संशयिताने शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी शिवीगाळ करुन नका असे सांगिले असता फिर्यादी सोळुंके यांना एसटीमधून बाहेर ओढून मारहाण करुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मनोल सोळुंके यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.