मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ चैत्रोत्सवात रक्तदान शिबिर
मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) : येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात ११०वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम सुरू असून, त्यासोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून या उत्सवात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये २७ जणांनी रक्तदान केले. कोल्हापुरातील वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटरच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव तीन एप्रिल रोजी पहाटेपर्यंत सुरू राहणार असून, त्यात दररोज विविध देवतांच्या यज्ञयागांसह कीर्तन, भोवत्या, संगीत मैफल असे विविध कार्यक्रम सुरू आहेत.
