कुदळीच्या लोखंडी दांड्याने मारहाण ; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ः शहरानजीकच्या काजरघाटी-चव्हाणवाडी येथे अंगणातील जागेची केस सुरु असताना कॉक्रीट घालण्यास फिर्यादी यांनी विरोध केला. संशयितांनी फिर्यादी यांना कुदळीच्या लोखंडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुनाथ सिताराम चव्हाण, त्रिनेत्र गुरुनाथ चव्हाण (दोघेही रा. चव्हाणवाडी, काजरघाटी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना शनिवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास काजरघाटी चव्हाणवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश सिताराम चव्हाण (वय ६३, रा. काजरघाटी-चव्हाणवाडी, रत्नागिरी) हे शनिवारी घरी असताना यांचा लहान भाऊ संशयित गुरुनाथ व त्यांचा मुलगा संशयित त्रिनेत्र चव्हाण हे त्यांच्या अंगणाची केस चालू असलेल्या जागेत कॉक्रीट घालत होते. त्याला फिर्यादी सुरेश चव्हाण यांनी विरोध केला. या कारणावरुन संशयितांनी कुदळीच्या लोखंडी पाईपच्या दांड्याने फिर्यादी यांना मारहाण केले. तसेच फिर्यादी यांचा मुलगा सुमित याला मारहाण केली. तसेच गरोदर सुन स्पृहा सुमित चव्हाण हीच्या पोटात कुदळीचा दांडा लागून दुखापत झाली. या प्रकरणी सुरेश चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.