दारु सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः व्यसन मुक्ती केंद्रात दारु सोडविण्यासाठी गेलेल्या प्रौढाला जेवणानंतर फिट आली. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. उत्तम आण्णाप्पा आवळेकर (वय ५०, रा. लिंगणूर-कापसी पो. अर्जूनी ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २९) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय पाली येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार शांताबाई आण्णाप्पा आवळेकर यांचा मुलगा दारुचा व्यसनी होता. त्याची दारुचे सेवन सुटावे यासाठी त्याला नरेंद्र महाराज व्यसन मुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. दुपारी जेवणाच्या सुटीत त्याला चक्कर आल्याने त्याला उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.