गोळप येथे मटका-जुगारावर पोलिसांची कारवाई
पावस ः तालुक्यातील गोळप येथील गोळप जेट्टी येथे पक्क्या शेडमध्ये विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उस्मान इस्माईल तांडेल (वय ४१, रा. गोळप मोहल्ला, गोळप, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.२९) दुपारी एकच्या सुमारास गोळप जेट्टी येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगार चालवत असताना सापडला. या प्रकऱणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.