दापोलीत १२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक
तालुक्यातील रिक्त सरपंच, सदस्यपदासाठी घोषणा
दापोली :
दापोली तालुक्यात ३१ जानेवारी रोजी विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी एकूण १६ जागांसाठी मतदान होणार आहे.
यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या १४ जागा, तर थेट सरपंचपदाच्या २ जागांचा समावेश आहे. सदस्य पदांच्या १४ रिक्त जागांपैकी अनुसूचित जातींसाठी ३, अनुसूचित जमातींसाठी ३, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३,. तर सर्वसाधारण गटासाठी ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सरपंच पदाच्या २ जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असून या पदांसाठी थेट जनतेतून निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत करजगाव, बांधतिवरे, पाचवली, सारंग, शिरसाडी, मांदिवली, कवडोली, फणसू-उर्फी, वेळवी, सडवे, देगाव आणि टाळसुरे या १२ ग्रामपंचायतींचा य समावेश आहे.