गुहागरात वीजपंप, पाईप चोराचा धुमाकूळ
गुहागर:
तालुक्यातील वरवेली ते गुहागर या दरम्यान गेले तीन महिने वीजपंप व पाईप चोराचे प्रमाण वाढत असताना आता भर वस्तीतील घराचे काम सुरू असलेल्या जागेवरून अर्धा एचपीचा वीजपंप चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञातावर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
घराच्या कामासाठी असलेला अर्धा एचपीचा ३५०० रुपये किंमतीचा पंप चोरीस गेला आहे. याप्रकरणी अनंत विखारे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे: गुहागर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातावर भा. दं. वि. कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या चोरीप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे अधिक तपांस करत आहेत.