जे.के. फाईल्स येथे अज्ञात मोटारीची दुचाकीला धडक ; स्वार जखमी
रत्नागिरी, ता. २४ ः शहरातील जे. के. फाईल्स बसस्टॉप ब्रीज जवळ अज्ञात मोटारीने दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात स्वार किरकोळ जखमी झाला. या प्रकरणी अज्ञात मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मिऱ्या नागपूर महामार्गावर जे. के. फाईल्स ब्रीज येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन चंद्रकांत खेत्री (वय २५, रा. क्रांतीनगर, झोपडपट्टी, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ बी.एच ६२६०) घेऊन रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते साळवी स्टॉप असे येत असताना जे. के. फाईल्स रस्त्यावर साळवी स्टॉप ते कुवारबाव जाणाऱ्या अज्ञात मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये फिर्यादी सचिन खेत्री हे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी सचिन खेत्री यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.