रनप प्रशासनाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
रत्नागिरी:
रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन, ‘माझी वसुंधरा अभियान‘ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025‘ अंतर्गत आयोजित जनजगृती स्पर्धा, तसेच ‘हर घर तिरंगा‘ अभियानातील विविध शालेय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे होत्या. यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे, स्वच्छता समिती सभापती बाबा नागवेकर, नगरसेवक सौ. स्मितल पावसकर, सौ. वर्षा ढेकणे, सौ. वैभवी खेडेकर, बंटी कीर, सौरभ मलुष्टे, राजू कीर, सौ. पूजा पवार, सौ. सुप्रिया रसाळ, सुहेल मुकादम, गणेश भारती आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये चित्रकला, रांगोळी, वत्तृत्व, निबंध, पत्रलेखन, प्रश्नमंजुषा आणि टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे अशा स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान या कार्यक्रमात स्पर्धेतील सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थीः रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. 15, दामले विद्यालय -चित्रकला स्पर्धा (लहान गट): स्पृहा जोशी (इयत्ता 4 थी), रांगोळी स्पर्धा (लहान गट): श्रेया लिंगायत (इयत्ता 4 थी), वत्तृत्व स्पर्धा (लहान गट): रोमा आनंद तापेकर (इयत्ता 4 थी), निबंध स्पर्धा (लहान गट): आराध्या कोकरे (इयत्ता 3 री), चित्रकला स्पर्धा (5 वी ते 7 वी): वंशिका सांगवेकर (इयत्ता 7 वी), चित्रकला स्पर्धा (8 वी ते 10 वी): चिन्मय आग्रे (इयत्ता 9 वी).
हर घर तिरंगा स्पर्धा: न.प.शाळा क्र. 15 दामले विद्यालय-पत्रलेखन स्पर्धा: दिशा कोलगे, रांगोळी स्पर्धा: संस्कृती गावीत, चित्रकला स्पर्धा: समृद्धी जाधव, प्रश्नमंजुषा स्पर्धा: वेदांत साळवी. रा. भा. शिर्के प्रशाला (बहुव्यवसायी)- निबंध स्पर्धा (5 वी ते 7 वी): स्वरा रांबाडे, निबंध स्पर्धा (8 वी ते 10 वी): रिद्धी लिंगायत. वत्तृत्व स्पर्धा (5 वी ते 7 वी): वैष्णवी पवार, रांगोळी स्पर्धा (5 वी ते 7 वी): श्रीशा तांबे, रांगोळी स्पर्धा (8 वी ते 10 वी): प्रतीक पुजारी, चित्रकला स्पर्धा (5 वी ते 7 वी): श्लोक पडवेकर, चित्रकला स्पर्धा (8 वी ते 10 वी): वेदा विजय पाडावे. पथनाटय़ संघ (विजेते): -स्वरा जाबरे, श्रीशा तांबे, वैदेही रहाटे, गार्गी ठसाळे, पूर्वी वाडेकर, आराध्या गोताड, भूमी बंडागळे, श्रावस्ती कांबळे, श्लोक पडवेकर, वेद प्रशांत राजीवले.
इकरा इंग्लिश मीडियम स्कूल-चित्रकला स्पर्धा (5 वी ते 7 वी): फातिमा दावुरकर, चित्रकला स्पर्धा (8 वी ते 10 वी): फातिमा वस्ता. मराठी मंदिर अ. के. देसाई हायस्कूल -निबंध स्पर्धा (5 वी ते 7 वी): जोया हडपोलकर, चित्रकला स्पर्धा (5 वी ते 7 वी): अश्विनी थापा, चित्रकला स्पर्धा (8 वी ते 10 वी): सरस्वती देवांगण, रांगोळी स्पर्धा (5 वी ते 7 वी): पुनिका दाभोळकर, रांगोळी स्पर्धा (8 वी ते 10 वी): मैथिली कांबळे, निबंध स्पर्धा (खुला गट): सौ. अंजली पिलणकर.
फाटक हायस्कूल, रत्नागिरी-चित्रकला स्पर्धा (5 वी ते 7 वी): स्पर्श लिंगायत, चित्रकला स्पर्धा (8 वी ते 10 वी): युक्ता गावखडकर, वत्तृत्व स्पर्धा (5 वी ते 7 वी): मुक्ता बापट, वत्तृत्व स्पर्धा (8 वी ते 10 वी): तपस्या बोरकर.
सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, – चित्रकला स्पर्धा (5 वी ते 7 वी): निधी शिवगण, चित्रकला स्पर्धा (8 वी ते 10 वी): ओम भारती, निबंध स्पर्धा (5 वी ते 7 वी): कौस्तुभ शिंदे, निबंध स्पर्धा (8 वी ते 10 वी): पूर्वा तुळसणकर, टाकाऊतून टिकाऊ वस्तू (5 वी ते 7 वी): तनिष्का मोहते, रांगोळी स्पर्धा (5 वी ते 7 वी): निहारिका आंबेरकर, रांगोळी स्पर्धा (8 वी ते 10 वी): ओम भारती, चित्रकला स्पर्धा : विघ्नेश कांदर. पटवर्धन हायस्कूल -निबंध लेखन (5 वी ते 7 वी): धैर्या गवाणकर, निबंध लेखन (8 वी ते 10 वी): सानिका अल्लोळकर, वत्तृत्व स्पर्धा (5 वी ते 8 वी): श्रीनिवास भिसे.
नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल -चित्रकला (लहान गट): आयशा सरदार, चित्रकला (मोठा गट): इक्रमा साखरकर, निबंध स्पर्धा (लहान गट): रुक्कया झारी, वत्तृत्व स्पर्धा: गार्गी पावसकर, निबंध स्पर्धा (मोठा गट): आयदा फणसोपकर, टाकाऊतून टिकाऊ (लहान गट): माझ मिरकर, (मोठा गट): इब्राहिम मुकादम, निबंध स्पर्धा (खुला गट): सौ. सायली खराडे, चित्रकला स्पर्धा (खुला गट): सौ. सायली खराडे, देव घैसास कीर सीनियर कॉलेज -निबंध स्पर्धा: नेहा गोसावी, चित्रकला स्पर्धा: गंधर्व बेलवलकर.
रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. 19 -राखी बनवणे स्पर्धा: स्वप्नाली कदम, चित्रकला स्पर्धा: काव्या घोसाळे, वत्तृत्व स्पर्धा: शौर्य वाडेकर. विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल -वत्तृत्व स्पर्धा (1 ली ते 4 थी): आरोही कुदळे, वत्तृत्व स्पर्धा (5 वी ते 7 वी): सम्यक घोडके, वत्तृत्व स्पर्धा (8 वी ते 10 वी): दीक्षा दहिवले, रांगोळी स्पर्धा (1 ली ते 4 थी): रिद्धी कळंबटे, रांगोळी स्पर्धा (5 वी ते 8 वी): कार्तिकी बोरकर, निबंध स्पर्धा (1 ली ते 4 थी): निहारिका पिलणकर, निबंध स्पर्धा (5 वी ते 7 वी): सोनाली बिर्जे, निबंध स्पर्धा (8 वी ते 10 वी): सार्था कांबळे, चित्रकला स्पर्धा (1 ली ते 4 थी): श्रीयुग राऊळ, चित्रकला स्पर्धा (5 वी ते 7 वी): नूरफातिमा खान, चित्रकला स्पर्धा (8 वी ते 10 वी): मनीषा यादव.
रत्नागिरी न.पा. शाळा क्र. 1 व 2 (टिळक विद्यालय) – हर घर तिरंगा स्पर्धा:चित्रकला स्पर्धा: स्नेहल वसावे, पत्रलेखन स्पर्धा: प्रतीक्षा सोलंकी, रांगोळी स्पर्धा: प्रीती गावणकर, राखी तयार करणे स्पर्धा: तुबा शेख, प्रश्नमंजुषा स्पर्धा: दिव्या जांगिड, तिरंगा मेळावा स्पर्धा: साहिल कांबळे