संगमेश्वरमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
संगमेश्वर : संगमेश्वर जुना वखार भागातील गद्रे वखार येथील गणपती विसर्जन घाट परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रामपेठ येथील पोलिसपाटील अंगराज प्रकाश कोळवणकर (वय ४०) यांनी याची खबर दिली.
त्यानुसार सुमारे ४० ते ४५ वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती मागील एक महिन्यापासून गद्रे वखार परिसरात फिरताना दिसत होता. २० मार्चला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जन घाट येथे तो मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.