पोचरीत वादातून मारहाण; चौघांवर गुन्हा
संगमेश्वर : तालुक्यातील पोचरी खालची देसाईवाडी येथे किरकोळ वादातून मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रथमेश संतोष राऊत (वय ३२, रा. पोचरी खालची देसाईवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल संजय जाधव, ओंकार संजय जाधव व त्यांच्यासोबत असलेल्या दोन व्यक्ती (सर्व रा. भोके, ता. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.