खानू येथे मोटार-दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर खानू येथे मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये स्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दीपक भिवाजी पवार (वय ५१, रा. वरेवली बुद्रुक ता. लांजा, रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खानू येथील प्रमेय एनर्जी सर्विस भारत पेट्रोलपंप या ठिकाणी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितनुसार संशयित मोटार चालक मोटार (क्र. एमएच ०५ ईव्ही ६४३५ ही रत्नागिरी ते लांजा असे जात असताना दुचाकीला (क्र. एमएच ०४ डीएल ७९९६) धडकली. यात चालक आशिष किसन धाडवे (वय ३३, रा. कडूगाव, ता. लांजा, रत्नागिरी) याचा मृत्यू झाला.