कुकरचे भांडे उघडताना गरम वाफेमुळे 13 वर्षीय बालिका भाजली
रत्नागिरी ः प्रतिनिधी
भाजीचा कुकर उघडताना वाफेमुळे कुकरचे झाकण उघडताना त्यातील गरम वाफेमुळे 13 वर्षीय बालिका भाजली तिला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वर्षा सोमनाथ जाधव (13,रा.भरणे नाका ग्रामपंचायत जवळ,खेड) असे भाजलेल्या बालिकेचे नाव आहे. गुरुवार 12 मार्च रोजी रात्री 9 वा.सुमारास तिला भूक लागल्यामुळे तिने आईने गॅसवर कुकरमध्ये बनवून ठेवलेले जेवण त्यातील भाजीचा कुकर उघडण्याचा प्रयत्न केला. कुकरचे झाकण उघडत असताना त्यातील गरम वाफेमुळे ती वाफेमुळे तिचा चेहरा,छाती,पोट भाजून फोड आले. ही बाब तिच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला उपचारांसाठी प्रथम खेडमधील कळंबणी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार करुन अधिक उपचारांसाठी तिला गुरुवार 19 मार्च रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयातील पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.