दाभोळे अपघात प्रकरणी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा
देवरुख ः दाभोळ-बाजारपेठ (ता. संगमेश्वर) येथे मद्याच्या नशेत निष्काळाजीपणे ट्रेलर चालवून रिक्षा व टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पो व रिक्षा, पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. या प्रकरणी संशयित ट्रेलर चालकाविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास प्रकाश गायकवाड (वय २८, रा. सांगोला, जि. सोलापूर) असे संशयित ट्रेलर चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावरिल दाभोळे बाजारपेठ येथे घडली. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी भुषण मनोहर शिंदे (वय ३५, रा. मुरलीधरआळी कोंडगाव ता. संगमेश्वर, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील टेम्पो (क्र. एमएच-०८ एपी ३८१०) कोंडगाव बाजारपेठ येथून सायंकाळी साडेचार वाजता दाभोळे व देवळे या टिकाणी माल पोचवून दाभोळे बाजारपेठ येथे गाडी पार्क करुन माल देत असताना रस्त्यावरुन मागून येणारा ट्रेलरने निष्काळजीपणे धोकादायक वाहन चालवून टेम्पोला व रिक्षा (क्र. एमएच-०८ ए क्यू ७१६५) ला धडक दिली. या अपघातात टेम्पो रस्त्याच्या खाली उतरला तर रिक्षा समोरच्या दुकानात शिरली या अपघातात दुकानदार देवदास झोरे यांच्या पत्र्याचे शेडचे नुकसान झाले तसचे हिरवे यांचे दुकानाबाहेरील मालाचे नुकसान झाले. या प्रकरणी भुषण शिंदे यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.