कोतवडे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः मधुमेहाचा त्रास असलेल्या तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दिपक कमलाकर वारेकर (वय ३६, रा. कोतवडे-सनगरेवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १४) दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपक वारेकर हे मधूमेहाने आजारी होते. गेले चार दिवस त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे येथे उपचार सुरु होते. शुक्रवारी (ता. १३) त्यांना या आजाराचा अधिक त्रास जाणवू लागला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.