‘जयगड’मध्ये ११ हजार टन गॅसचे जहाज
जिल्ह्यासाठी ८५० टन राखीव साठा; सिलिंडर टंचाईचे सावट दूर
रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यावर घोंघावणारे गॅस टंचाईचे सावट आता पूर्णपणे दूर होणार आहे. जयगड बंदरात ११ हजार टन गॅस वाहून नेणारे अजस्त्र जहाज थांबवले असून, यातील ८५० टन गॅस विशेष साठा म्हणून जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे, असे जिल्हाधिकारी एम. जिंदल यांनी सांगितले.
जिल्ह्यातील गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये आणि सर्वसामान्य ना गरिकांना वेळेत सिलिंडर मिळावा, या साठी प्रशासनाने आपल्या विशेष अधिकारांचा वापर केला आहे. जयगड येथे थांबवण्यात आलेल्या या जहा जा मुळे जिल्ह्याकडे आता गॅसचा मोठा राखीव साठा तयार झाला आहे. जयगडमधील जहाजातून ८५० टन गॅस जिल्ह्याला मिळणार असून, यामुळे आगामी काळातील टंचाईची भीती मावळली आहे. जिल्ह्यात सध्या घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
गॅस वितरणाचे नियोजन आता थेट प्रशासनाच्या देखरेखीखाली सुरू आहे. केवळ आवश्यकतेनुसारच सिलिंडर बुक करावेत, विनाकारण साठवणूक करू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सध्याचा उपलब्ध साठा संपल्यानंतर आणि खरोखरच गरज भासली तरच जहाजातील गॅसचा वापर केला जाणार आहे. जिल्ह्यासाठी गॅसचा पुरेसा साठा आता उपलब्ध झाला आहे.