गृहिणी बचतगटा कडुन महिला दिनाचे औचित्य साधून आधार नागरी बेघर निवारा केंद्र येथे वस्तूचे वाटप
रत्नागिरी : शहरातील गृहिणी बचत गटा मार्फत महिला दिनानिमित्त निराधार लोकांना दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तू भेट देण्यात आले. या बचत गटामार्फत दरवर्षी गरजू लोकांना मदत केली जाते यावर्षी गृहिणी महिला बचत गटाने आधार नागरी बेघर निवारा केंद्राला भेट देऊन तेथे असणाऱ्या निराधार लोकांना कोलगेट, साबण, खोबरेलतेल,आयोडेक्स, पेनबाम, विक्स,मारी बिस्कीट, इत्यादी वस्तू भेट देण्यात आल्या यावेळी गृहिणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रिजवाना निसार शेख, यांच्यासाह सौ.योगिता विजय गवाणकर, सौ.रोशनी फेपडे, सौ. वैष्णवी दळवी, श्रीमती विद्या सुनील सुर्वे, सौ.सुरेखा पांडुरंग मुदने, सौ.नूतन संदीप गोरीवले, सौ.निकिता मयूर सुपल. या बचत गटाच्या महिला सभासद उपस्थित होत्या.