गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन तरुण रुग्णालयात
रत्नागिरी, ता. १३ ः तालुक्यातील शिवार आंबेरे येथील तरुणाने घरातून दुचाकी खरेदीसाठी पैसे देत नाहीत या मानसिकतेने आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुयोग संतोष मोर्ये (वय २२, रा. शिवार आंबेरे, रत्नागिरी) असे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१३) सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुयोग मोर्ये याला दुचाकी खरेदी करावयाची होती. यासाठी घरातून पैसे मिळत नसल्याच्या मानसिकतेने त्याने आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.