पऱ्याची आळी येथे मटका जुगारावर कारवाई
रत्नागिरी
शहरातील पऱ्याची आळी येथे पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह २ हजार १०० रुपयांची मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदन गजानन सातपुते (वय ४५, रा. तांबटआळी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास पऱ्याची आळी येथील गुरुकृपा हॉल जवळली गटाराच्या स्लॅब निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित चंदन सातपुते यांच्याकडे विनापरवाना मटका-जुगाराचे २ हजार १०० रुपयांसह साहित्य सापडले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळू पालकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.