उलटी झालेल्या शिवारआंबेरेतील वृद्धाचा मृत्यू
पावस:- उलटी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. धर्माजी नारायण लाखण (वय ७४, रा. शिवारआंबेरे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) दुपारी बाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.७) ला धर्माजी लाखण यांना अस्वस्थ व उलटी झाल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. पुर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.