सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी – तालुक्यातील बांबरफाटा येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिर दत्ताराम पेडणकेर (वय ५२, रा. साठरेबांबर, तेरेकरवाडी-रत्नागिरी) असे मद्यपान करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ९) दुपारी पावणे एकच्या सुमारास बांबर फाटा येथील रस्त्याच्या बाजूस आंब्याच्या झाडाखाली निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समीर पेडणेकर हे सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्य पिण्यासाठी स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत आढळले. या प्रकरणी पोलिस शिपाई सुर्याजी पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत पाली दूरक्षेत्र येथे तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.